नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ईव्हीएम मशिनला हार घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

स्वामी शांतीगिरी मराहाज त्र्यंबकेश्वरच्या MVP महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी ईव्हीएम मशिनला हार घातला होता. याप्रकरणी तहसीलदाराने तक्रार दाखल केल्यानंतर शांतिगिरी महाराजांविरूद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.