मुंबई – अवकाळी पावसामुळे वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे वडाळा येथे श्रीजी टॉवरच्या शेजारील कार पार्किंगसाठी बनविण्यात येत असलेले टॉवर कोसळले.
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बचाव कार्य सुरु केले. हा टॉवर ८ ते १० वाहनांवर कोसळला. त्यातील एका वाहनात एकजण अडकला असून मदत व बचावकार्य सुरू आहे.