दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष…

Published:

पुणे –  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला असून, पाचपैकी तीन आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले तर दोन आरोपींना सश्रम जन्मठेप ठोठावली आहे. या प्रकरणात वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर यांना निर्दोष ठरवले आहे. तर शरद कळसकर, सचिन अंदुरे यांना सश्रम जन्मठेप ठोठावली आहे. तब्बल ११ वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.

विज्ञानवादी विचारधारा मानणारे ज्येष्ठ समाजसुधारक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या ओंकारेश्वर पुलावर सकाळी ७ः३० वाजता मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दाभोलकर हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते संस्थापक होते. दाभोलकर खूनप्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात आला होता.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page