मुंबई – औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या निर्णयावर आज मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला स्थानिकांनी विरोध केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज (बुधवार) झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायायालाने नामांतराच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत.
हे नामांतर करण्यात काही गैर नाही. ते कोणत्याही चुकीच्या मार्गाने करण्यात आले नाही असे सांगत हे नामांतर वैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.