प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरावेत – संजय राऊत…

Published:

मुंबई – आजही या देशामध्ये विरोधी पक्षांच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतो कारण समस्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याच काम शरद पवार करू शकतात त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताना प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरावेत असा सल्ला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले कि, प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाहीत. चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचितची युती झाली. आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि वंचित यात प्राथमिक चर्चाही झाली आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत अशाप्रकारची विधाने करणे आम्हाल मान्य नाही.

शरद पवार हे देशाचे उत्तुंग नेते आहेत ते भाजपचे आहेत असे बोलणे त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर मोठा आरोप करण्यासारखा आहे. जर ते भाजपचे असते, तर महाराष्ट्रात त्यांनी भाजपला दूर ठेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली नसती त्यांनी प्रत्येक वेळेस भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला.

आजही या देशामध्ये विरोधी पक्षांच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतो कारण समस्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याच काम शरद पवार करू शकतात त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरावेत असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि त्यांची चर्चा झाली आहे भविष्यात महाविकास आघाडीत सोबतच काम करावे लागणर आहे. त्यामुळे भूतकाळातील मतभेद दूर ठेवून भक्कम आघाडीसाठी प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page