सोलापूर – सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदाराने पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. संतापलेल्या मतदाराने थेट ईव्हीएम मशीनला आग लावली. मतदान केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या आगीची घटना लक्षात येताच ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवली.
दरम्यान, मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित तरूणाला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.