रायगड – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. महाडमध्ये ही घटना घडली असून, सुदैवाने सुषमा अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप आहेत. सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याअगोदर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या. दरम्यान, हि घटना घडली.