मुंबई – लोकसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेसने मुंबईतला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडीतून उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. त्यानंतर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.