राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध…

Published:

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणूक २०२४ साठी जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला.या जाहीरनाम्याला शपथनामा असे नाव देण्यात आले आहे.

या शपथनाम्यात घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, जयंत पाटील यांनी शपथनाम्यातील आश्वासनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दरम्यान, वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page