मैदानावरून अमरावतीत राडा…

Published:

अमरावती – अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या परवानगीवरून प्रहारचे नेते बच्चू कडू आज प्रचंड आक्रमक झाले होते. या परवानगी वरून बच्चू कडूंची अमरावती पोलिसांशी बाचाबाची देखील झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या (२४ एप्रिल) सायन्सकोर मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली आहे. मात्र हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

बच्चू कडू यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी २३ व २४ एप्रिल असे दोन दिवस सायन्सकोर मैदान बुक केलं आहे. त्यासाठी पैसेही भरले आहेत. मात्र २४ तारखेला या मैदानावर अमित शहा यांची महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. अमित शाह यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्सकोर मैदान आजच ताब्यात घेतलं आहे. अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी आधीच बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी मैदान ताब्यात घेतल्यानंतर बच्चू कडू शेकडो कार्यकर्त्यांसह ग्राउंडवर दाखल झाले. त्यानंतर बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झाला. बच्चू कडू यांनी पोलिसांना विनंती केली की, आमच्याकडे रीतसर परवानगी आहे, त्यामुळे आम्हाला मैदानाचा ताबा द्या.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page