मुंबई – रे रोड परिसरातील दारुखाना येथे असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास ही आग लागली. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.