नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात ५ न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
दिल्लीतील AICC मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते.
काँग्रेसचा जाहीरनामा GYAN या संकल्पनेवर आधारीत आहे. G म्हणजे गरीब, Y म्हणजे यूथ, A म्हणजे अन्नदाता तर N म्हणजे नारी. आम्ही एकत्रितपणे या अन्याय काळातील अंधार दूर करू आणि भारतातील लोकांसाठी समृद्ध, न्यायाने परिपूर्ण आणि सुसंवादी भविष्याचा मार्ग प्रशस्त करू, असे काँग्रेसने म्हटले आहे.