भिवंडी – काल्हेर परिसरातून खंडणी विरोधी पथकाने ४० लाखांचा गुटखा जप्त करून दोघांना अटक केली. शरीफसाब अब्दुलगौस सावनुर आणि इसाकअहमद अन्वरसाब निजामी अशी या दोघांची नावे आहेत. यासोबतच पोलिसांनी कंटेनर देखील जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काल्हेर परिसरातील राजलक्ष्मी कंपाउंड,एम गोडाऊन लगत असलेल्या सार्वजनिक रोडवर सापळा रचून गुटखा, पान मसाला, तंबाखु जर्दा असा एकूण ४०,८०,०००/- रूपये किंमतीचा माल तसेच कंटेनरसह एकूण ५५,९०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. हा गुटखा कर्नाटक राज्यातून आल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध २, गुन्हे शाखा, इंद्रजित कार्ले, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सपोनि श्रीकृष्ण गोरे, सपोनि भुषण कापडणीस, सपोनि सुनिल तारमळे, पोउनि विजयकुमार राठोड, सपोउनि सुभाष तावडे, सपोउनि कल्याण ढोकणे, सपोउनि संजय बाबर, पोहवा सचिन शिंपी, पोहवा योगीराज कानडे, पोहवा संदिप भोसले, पोहवा संजय राठोड, पोहवा गणेश गुरसाळी पोशि तानाजी पाटील, पोशि अरविंद शेजवळ, पावसकर, चापोना भगवान हिवरे यांनी केली.