अमरावती – बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दिनेश बूब यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. दिनेश बूब हे ठाकरे गटाचे नेते होते, त्यांनी राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत प्रहार पक्षात प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात आक्रमक भूमिका घेत उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे प्रहार पक्षाकडून उमेदवार जाहीर झाला आहे.