दुचाकी चोरास अटक; १३ दुचाकी हस्तगत… 

Published:

डोंबिवली – कल्याण डोंबिवली परिसरातून महागडया बुलेट व इतर मोटार सायकल चोरी करणा-या अट्टल चोरटयास गुन्हे शाखा घटक ३ कल्याण पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एकूण १३ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. शुभम पवार असे या चोरट्याचे नाव आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरातून मोठया प्रमाणात मोटार सायकली चोरीस जात असल्याने मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे  कोळेगाव, मानपाडा डोंबिवली पूर्व परिसरातून शुभम पवार यास अटक केली. त्याच्याकडे मोटारसायकल चोरीबाबत चौकशी केली असता महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतून १ बुलेट मोटारसायकल चोरी केली असून ती सध्या निलंगा जिल्हा – लातूर या ठिकाणी ठेवली असल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाणे सदर बाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शुभमकडे आणखी चौकशी केली असता त्याने कल्याण डोंबिवली परिसरातून एकूण १३ मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले.

पोलिसांनी सदर प्रकरणी कल्याण डोंबिवली परिसरातून चोरी केलेल्या एकूण- १६,०५,०००/- रूपये किंमतीच्या एकूण १३ मोटार सायकली निलंगा, लातूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून हस्तगत करून कल्याण व भिवंडी परिमंडळ मधील तसेच कल्याण रेल्वे पोलीस ठाणे कडील एकूंण १३ गुन्हे उघडकीस आणले

सदर यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३. कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोउपनिरी नवनाथ कवडे, पोहवा विश्वास माने, पोहवा ३५१८ अनुप कामत, पोहवा किशोर पाटील, पोहवा रमाकांत पाटील, पोहवा बालाजी शिंदे, पोहवा विलास कडु, पोहवा प्रकाश इदे पोहवा प्रविण बागुल, पोहवा प्रविणकुमार जाधव, पोहवा गोरखनाथ पोटे, पोहवा उल्हास खंडारे, मपोहवा  ज्योत्स्ना कुंभारे, मपोहवा मेघा जाने, पोना  सचिन वानखेडे, पोना देवेप्पा हुंडेकरी, पोशि गुरूनाथ जरग पोशि  मिथुन राठोड, पोशि  उमेश जाधव, पोशि विनोद चन्ने, पोशि गोरक्ष शेकडे चापोहवा अमोल बोरकर पोशि राहुल ईशी यांनी केली..

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page