मुंबई – राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीमध्येच राहणार आहेत. जानकरांनी आपण महायुतीतच राहणार असल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. तसेच अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते.
या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. त्यावेळी महायुतीने रासपला लोकसभा निवडणुकीत एक जागा सोडणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.