मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी होती. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अनेकांनी घरातून रस्त्याकडे धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जवळ भूकंपाचे केंद्र होते. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. एक 3.6 तर दुसरा 4.5 रिश्टल स्केलचा भूकंप होता. दरम्यान, भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने या भागामध्ये कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.