पुणे – एका गॅरेजला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गंगाधाम परिसरात आई माता मंदिराजवळ मोकळ्या जागेत एक प्रसिद्ध गॅरेज आहे. या गॅरेजला अचानक आग लागली आणि १७ वाहने जाळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.