मुंबई – राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या एकूण 30 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यात लवकरच विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमाच्या एकूण 30 परीक्षा येत्या 30 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु आता या परीक्षा पुढे ढकलून 07 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे.
यामध्ये विधि (Law), अभियांत्रिकी (Engineering), विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथे सत्र, वाणिज्य (Commerce) आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश होता.पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी (MA- Sem II, Sem IV) सत्र तिसरे आणि चौथे, विधि अभ्यासक्रमाचे (Law : LLM : Sem III, BBA -LLB Sem III) सत्र तिसरे, अभियांत्रिकी (Engineering : SE Sem III) अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या (Science : M.Sc Sem IV, M.Sc Part II) एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य (Commerce: M.Com Part II) शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा 30 जानेवारी रोजी नियोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता त्या 7 फेब्रुवारी 2023 पासून घेण्यात येणार आहेत असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.