दिल्ली – राजधानी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी दुपारी (२४ जाने) भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता आणि भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जमीनपासून 10 किमी खोलीवर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
दरम्यान, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही.