लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर…

Published:

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये १६ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १९५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. 

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची घोषणा केली. या यादीत ३४ केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच २८ महिला, ४७ उमेदवार (वय ५० पेक्षा कमी असलेले) २७ उमेदवार SC, १८ उमेदवार ST आणि ५७ उमेदवार ओबीसी आहेत. परंतु पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

या यादीत प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनाथ सिंह, स्मृती इराणी यांची नावे आहेत.

भाजपच्या यादीतील प्रमुख उमेदवार…

वाराणसी- नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

गांधीनगर- अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री)

अरुणाचल वेस्ट- किरण रिजिजू

गुना-ज्योतिरादित्य शिंदे

विदिशा- शिवराज सिंह चौहान (माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)

कोटा- ओम बिर्ला (लोकसभा अध्यक्ष)

अमेठी- स्मृती इराणी

लखनऊ- राजनाथ सिंह

मथुरा- हेमा मालिनी

भाजपची राज्यानुसार यादी… 

उत्तर प्रदेश- ५१

पश्चिम बंगाल- २०

मध्य प्रदेश- २४

गुजरात- १५

राजस्थान- १५

केरळ- १२

तेलंगणा- ०९

आसाम- १२

झारखंड- ११

छत्तीसगड- ११

दिल्ली- ०५

जम्मू् काश्मीर- ०२

उत्तराखंड- ०३

अरुणाचल प्रदेश- ०२

गोवा- ०१

त्रिपूरा-०१

अंदमान निकोबार- ०१

दीव दमन- ०१

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page