रायगड – १५ हजाराची लाच घेताना एका कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांनी रंगेहात पकडले. ओम शिंदे असे या कनिष्ठ अभियंत्याचे नाव असून, तो मराविवि मंडळ कोकबन, उप विभाग मुरूड, ता. मुरुड येथे कनिष्ट अभियंता या पदावर कार्यरत आहे.
तक्रारदार यांच्या राहत्या घराचा खंडीत केलेला विजपुरवठा पुर्ववत करण्याकरीता ओम शिंदे यांनी तक्रादाराकडे २०,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबत तकार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी केली असता ओम शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे २०,०००/- रूपये लाचेची मागणी व तडजोडी अंती १५,०००/- रूपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निषन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांनी सापळा रचून ओम शिंदे यांना तक्रारदार यांच्याकडून १५,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.