नाशिक – एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली. अशोक नजन असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून, ते अंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते.
दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.