धनगर आरक्षणाच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या…

Published:

मुंबई – धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी करणाऱ्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मुंबई हायकोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळण्याच्या मागणीने गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरला होता. मात्र, या सगळ्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावल्या. तसेच धनगर आणि धनगड एकच नाहीत हे देखील स्पष्ट केले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page