पुणे – तरुणाने पोलीस चौकी समोरच स्वत:ला पेटवून घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस चौकीसमोर हि घटना घडली.
मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला मात्र आरोपींवर कारवाई केली नसल्याने रोहिदास जाधव या तरुणाने वाघोली पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये तो ९० टक्के भाजला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.