डोंबिवली – दरवर्षी प्रमाणे ॐ श्रद्धा मित्र मंडळ सार्वजनिक माघी गणेश उत्सव आयोजित ‘डोंबिवलीच्या इच्छापूर्तीचे’ याहीवर्षी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोल ताशाच्या गजरात चिंचोडयाचा पाडा येथे आगमन झाले आहे. यंदा श्रींची मूर्ती १८ फुट उंच असून, या मूर्तीचे मूर्तिकार सिद्धेश दिघौले आहेत.
यंदा हे मंडळाचे १३ वे वर्ष असून, अध्यक्ष ओमकार म्हात्रे, उपाध्क्ष महेश भोईर, खजिनदार दिगंबर म्हात्रे, दीपेश म्हात्रे, आधारस्तंभ मा. नगर सेवक विकास गजानन म्हात्रे, विलास गजानन म्हात्रे आहेत.
दरम्यान, ५ दिवसाच्या या उत्सवात मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या मंडळातर्फे सांस्कृतिक भजन, चित्र कला स्पर्धा, डान्स स्पर्धा, हळदी कुंकू, होम मिनिस्टर, आरोग्य शिबीर असे अनेक कार्यक्रम राबविण्यात यात असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.