मुंबई – ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिस नोरेवा नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला. अभिषेक घोसाळकर यांना ३ गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.