मुंबई – काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली.
बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि हा 48 वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे आहे असे बरेच काही आहे, पण म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या असतात. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.