नांदेड – नांदेड जिल्हयात महाप्रसादातून लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका धार्मिक कार्यक्रमात देण्यात आलेल्या महाप्रसादातून दोन ते अडीच हजार लोकांना विषबाधा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहा तालुक्यातील सावरगाव कोस्टवाडी येथे बाळुमामाचा प्रसाद म्हणून भाविकांना उपवासाची भगर (खीर) वाटप करण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी हा प्रसाद सेवन केला. महाप्रसादाचं सेवन केल्यानंतर अनेकांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.