गांजा विक्री करण्यासाठी आलेला सराईत जेरबंद…

Published:

ठाणे – गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईतास मुंब्रा पोलिसांनी अटक करून २२ किलो गांजा जप्त केला. रहेमत खान तमिझ खान असे याचे नाव आहे.

दिवा चौक जवळील जयेश वाईन शॉपच्या समोर एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून रहेमत खान तमिझ खान यास अटक केली. तसेच त्याच्याकडून २२ किलो गांजा, १ कार, २ मोबाईल असा एकूण ५,०५०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची यशस्वी कामगिरी डॉ. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे, गणेश गावडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १, विजयसिह भोसले सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मुद्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक संजय पवार, पो. उप निरीक्षक/ नितीन भोसले व एन हो पी एस पथकातील पोलीम अंमलदार उमेश राजपुत, प्रमोद जमदाडे, दिपक उदमले, प्रकाश गडदे यांनी केलेली असुन पुढील तपास उप निरीक्षक/नितीन भोसले व पथक करीत आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page