मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस…

Published:

मुंबई – मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटिस बजावली असून, आझाद मैदानाऐवजी खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदान पोलिसांनी जरांगेना नोटीस दिली आहे.

आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत त्यांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत. तसेच या आंदोलनामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी नवी मुंबईतील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान खारघर इथे आपलं आंदोलन करावं असे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page