हाँगकाँगला मागे टाकत भारतीय शेअर बाजार प्रथमच जागतिक स्तरावरावरील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे.इक्विटी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि डेटा सेवा प्रदान करणारी कंपनी ब्लूमबर्गच्या मते,भारतीय एक्स्चेंजवर सूचीबद्ध समभागांचे भांडवलीकरण ४३ ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचले आहे.हाँगकाँगच्या ४२ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा ते जास्त आहे.
गेल्या महिन्याच्या ५ तारखेला भारताच्या शेअर बाजार भांडवलाने प्रथमच चाळीस ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला. वाढते किरकोळ गुंतवणूकदार,संस्थात्मक परदेशी गुंतवणूकदारांची सततची गुंतवणूक,कॉर्पोरेट क्षेत्रात वाढलेली विक्री आणि मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टींमुळे भारतीय शेअर बाजारातील मूल्यांत वाढ झाली आहे.