मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय…
नवी मुंबई – नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती २५ जानेवारीला बंद राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
या आंदोलकांचा मुक्काम २५ जानेवारी रोजी रात्री नवी मुंबईत असणार आहे. त्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मार्केट परिसरात आंदोलकांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी २५ जानेवारी रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाचही मार्केट बंद राहणार असून २६ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असे दोन दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती बाजार समिती सचिव पी. एल. खंडागळे यांनी दिली आहे.