डोंबिवली – डोंबिवलीतील खोणी पलावा येथील इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील ऑरेलिया इमारतीला भीषण आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या सातव्या मजल्यावर शॉर्ट सर्कीट झाल्याने ही आग लागली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे. इमारतीमधील रहिवाशांना सुखरूपणे बाहेर काढण्यात आले तसेच सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.