पुणे – गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीसांसोबत तडजोड करतोय असे सांगून ५ लाखांची लाच मागणाऱ्या वकिलाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सुमित नामदेवराव गायकवाड असे या वकिलाचे नाव असून, याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांच्या दोन्ही मित्रांना पोलीस शास्त्रीनगर पोलीस चौकी, कोथरुड येथे घेऊन गेले होते, त्यानंतर तक्रारदारांच्या मित्राचे ओळखीचे वकील सुमित गायकवाड यांनी तक्रारदार आणि त्यांच्या दोन्ही मित्रावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीसांसोबत तडजोड करतोय असे सांगून ५ लाख रुपयांची मागणी केली.
त्याप्रमाणे सुमित गायकवाड यांनी तक्रारदारांकडून १ लाख रुपये व तक्रादारांच्या मित्रांकडून फोन पे द्वारे ५० हजार आणि ५ हजार रुपये असे एकूण १ लाख ५५ हजार रुपये घेतले होते आणि ते उर्वरित रक्कम देत नाही तोपर्यंत तक्र्रादरांविरुद्ध असलेला पुरावा मी नष्ट करणार नाही असे सांगून आणखी 3 लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
त्याअनुषंगाने गायकवाड यांना फोन पे द्वारे त्यांच्या अकाऊंटमध्ये २० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने ताब्यात घेतले आहे.