फ्लाइंग कंदील विक्री, साठवणूक व वापरावर बंदी…

Published:

मुंबई – मानवी जीवन व सार्वजनिक शांतता, सुरक्षितता यांना गंभीर धोका, असामाजिक घटकांच्या कारवायांची शक्यता लक्षात घेता फ्लाइंग कंदिलाचा वापर, विक्री व साठवणूक बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 29 जानेवारी 2024 पर्यंत लागू करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त (अभियान), विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

फ्लाइंग कंदिलाद्वारे असामाजिक घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. मानवी जीवन व सार्वजनिक शांतता, सुरक्षितता यांना गंभीर धोका निर्माण होऊ नये म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page