रायगड – रोहा शहरातील एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये बंदूक, रिवॉल्वर, तलवारी, चाकू, दारूगोळा आदींचा समावेश आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे धनगर आळीत राहणाऱ्या तन्मय भोपटे या तरुणाच्या घरातून हा शस्त्र साठा जप्त केला. यामध्ये ४ बंदूक, १ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर, २ धारदार तलवारी, ६ कोयते, ५ धारदार चाकू, ५ रिकामे काडतूस, बंदूक व काडतुसे बनवण्याचे साहित्य, ५ धारदार चाकू, ९० जिवंत काडतुसे, हरीण व इतर प्राण्यांचे २२ शिंगाचे जोडी यांचा समावेश आहे.
दरम्यान, सदर प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तन्मय भोपटे यास अटक करण्यात आली आहे.