नवी दिल्ली – लोकसभेतून आज पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेतील सुरक्षायंत्रणा भेदण्याच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सदेत येऊन निवेदन करावे, या मागणीसाठी आज सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे लोकसभेत पुन्हा एकदा खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावश आहे. तसेच शशी थरूर, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम यांच्यासह एकूण ४९ खासदारांना हिवाळी अधिवेशन काळापुरते निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आता दोन्ही सभागृहातून आतापर्यंत १४१ खासदारांचं निलंबन झाले आहे.