मुंबई – महीलेचा मोबाईल जबरीने चोरी करणा-यास साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. अजय साबळे असे याचे नाव आहे.
चौधरी बंक्वेट हॉल, ९० फिट रोड, साकीनाका येथे एक परदेशी रशियन महिला मुंबई विमानतळावर जाण्यासाठी कार बुक करत असताना तिच्या हातातील मोबाईल एका इसमाने जबरदस्तीने चोरून नेला असल्याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अजय साबळेला अटक करून त्याच्याकडून चोरी केलेला ७० हजार रु. किंमतीचा मोबाईल हस्तगत केला.


