पुणे – नगर मार्गावर वडगाव शेरी येथे गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या टँकरमधून इथेलिन ऑक्ससाईड वायूची वाहतूक केली जात होती, हा टँकर वडगाव शेरी चौकात आला असता, टँकर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला आणि मोठ्या प्रमाणात वायू गळती होण्यास सुरुवात झाली. या गळती मुळे रस्त्यावर गॅस पसरला होता.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी टँकरवर पाण्याचा मारा केला.