मुंबई – नशा करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून एका दाम्पत्याने आपल्या दोन मुलांना विकल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी मुलांना विकणाऱ्या या पती -पत्नीला आणि आणखी दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शब्बीर खान, सानिया शब्बीर खान अशी पती -पत्नीची नावे तर उषा राठोड आणि शकील मकरानी इतर दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही ड्रग्जच्या नशेच्या आहारी गेले होते, त्यांच्याकडे नशा करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून या दोघांनी त्यांचा २ वर्षांचा मुलगा आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलीची विक्री केली. मुलांच्या आत्याला हा प्रकार कळल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.


