मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विटर वरून शेअर केला आहे. राऊत यांनी ६ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओला मकाऊ की रातें.., पिक्चर अभी बाकी है..असे कॅप्शन दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी मकाऊतील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कॅसिनोतील कथीत फोटो शेअर केला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात बरेच वादळ उठले होते. त्यानंतर पुन्हा राऊत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये एका कसिनोसदृश्य ठिकाण दिसत आहे. एक व्यक्ती कॅमेरा घेऊन चालत आहे. आजूबाजूला अनेक टेबल आणि खुर्चीवर लोक बसले आहेत.


