मुंबई – भायखळ्यातील म्हाडा कॉलनीत असलेल्या एका २४ मजली इमारतीच्या तिसरा मजल्याला आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत १३५ लोक अडकले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घोडपदेव परिसरात म्हाडाच्या कॉलनीत असलेल्या न्यू हिंद मिल कंपाउंडमधील २४ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हि आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि या आगीतून १३५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
दरम्यान, अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


