हिंगोली जिल्हा परिषदेच्या इमारतीला अचानक आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अभ्यागत कक्षामागे असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये हि आग लागली. आगीमध्ये व्हिसी हॉल मधील साहित्य जळून खाक झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिंगोली पालिकेचे अधिकारी आणि अग्नीशमन दलाने धाव घेतली. आणि अग्नीशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले.