मुंबई – वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे येथील गाझधर बंध मार्गावरील फिटर गल्लीत एका बैठ्या घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.


