भिवंडी – एका टेक्सटाईल कंपनीत आग लागल्याची घटना घडली. वळपाड्यातील पारसनाथ कंपाऊंड येथील एका उशा बनवणाऱ्या कंपनीत आग लागली. दुर्दैवाने या आगीत १ महिला आणि तिचा ३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले.