नवी दिल्ली – शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. दोन्ही कडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर यावर दोन्ही गटांना लेखी उत्तर (सोमवार २३ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच पुढील सुनावणी आता ३० जानेवारीला होणार आहे.
ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला.