मुंबई – ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नई येथून ललित पाटील पोलिसांनी अटक केली.
ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती, अनेक आरोप प्रत्यारोप होत होते. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी दहा पथके तयार केली होती. त्याचा शोध पोलीस घेत होते.
दरम्यान, ललित पाटील चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अखेर ललित पाटीलला तामिळनाडूील चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.