मुंबई – शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर ऐवजी ही सुनावणी आता १२ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता होणार आहे. याबाबत ठाकरे आणि शिंदे गटाला ईमेलद्वारे माहिती देखील देण्यात आली आहे. जी 20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
याबाबत राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली आहे. जी 20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी एक दिवस आधी घेणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.