‘या’ ५ राज्यातील निवडणुका जाहीर…

Published:

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यानुसार मध्यप्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर, मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची  मतमोजणी ३ डिसेंबरला रोजी होणार आहे.

दरम्यान, या पाच राज्यात ६७९ जागांवर मतदान होणार आहे. तसेच ६० लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. तसेच मिझोराममध्ये 8.52 लाख जागा आहेत, छत्तीसगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशात 5.6 कोटी.” ‘राजस्थानमध्ये 5.2 कोटी आणि तेलंगणात 3.17 कोटी मतदार आहेत. सर्व राज्याचे मिळून एकूण 8.2 कोटी पुरुष आणि 7.8 कोटी महिला मतदार आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page